ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामसभेमध्ये जनजागृती करून प्लास्टिक बंदीचा ठराव करण्यात आला आहे. गावातील दुकानदारांना सूचना देऊन कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच, गावामध्ये विविध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त गावाचा संदेश पोहोचविण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक केज बसविण्यात आल्या असून, गावाच्या स्वच्छतेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे.
सन २०२३-२४ या कालावधीत पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास चालना देण्यासाठीही उपक्रम राबविण्यात आले. श्री नारायण कृष्णा पालवकर (कुरतडे-पालवकरवाडी) यांनी आपल्या बागेत सौरपंप बसवून नवीकरणीय ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गावातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.










