रोजगार आणि कौशल्य विकास

ग्रामपंचायत क्षेत्रात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामस्थांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाला चालना मिळाली आहे. या उपक्रमांमुळे ग्रामविकासात महिलांचा सहभाग वाढला असून आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे.

डुगवे येथे कार्यरत असलेला “लोटेश्वर काजू उद्योग” हा स्थानिक महिलांसाठी रोजगाराचे प्रभावी साधन ठरला आहे. तसेच कुरतडे शिंदेवाडी येथील कु. साक्षी प्रकाश आंब्रे हिने ग्रामपंचायत महिला प्रशिक्षण मेळाव्यात प्रशिक्षण घेऊन स्वतःचा घरगुती केक बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या या उपक्रमाला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ती अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनली आहे.